Home ताज्या घडामोडी अमेरिकेत सत्तासंघर्ष ; हिंसाचारात एक ठार

अमेरिकेत सत्तासंघर्ष ; हिंसाचारात एक ठार

वॉशिंग्टन

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असून यात एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुन्हा एकदा कॅपिटॉल इमारतीभोवती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली. पोलीस सध्या ट्रम्प समर्थकांना हटवण्याचं काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प यांचे समर्थक इमारतीबाहेर उपस्थित होते. इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतानाही ट्रम्प समर्थक कर्फ्यूचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात इमारतीबाहेर जमले होते. बैठक सुरु असतानाच आंदोलकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि इमारतीत प्रवेश केला.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे. महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती अशी माहिती सीएनएनने दिली आहे.

ट्विटने केला ट्रम्प यांचा अकाऊंट ब्लॉक

अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने १२ तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं असून त्यांचे तीन व्हिडीओ हटवले आहेत. या व्हिडीओंमुळे हिंसाचार भडकण्याची भीती असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्याकडून शांततेचं आवाहन

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून हिंसाचार करु नका असं सांगितलं आहे. आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग आहोत असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments