Home ताज्या घडामोडी रास्ता काँक्रीटीकरणात गाडला ट्रॅक्टर!

रास्ता काँक्रीटीकरणात गाडला ट्रॅक्टर!

धारणी

शहरात नगरपंचायत प्रशासनाद्वारे गुजरी बाजाराची निर्मिती करीता बाजार ओटे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.या बांधकामात ठेकेदाराने चक्क ट्रॅक्टर काँक्रेटिकरण कामात गाडल्याने मेळघाटात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टर मालकाने कुठलाही आक्षेप घेतला नसल्याने धारणी शहरात घडलेला हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली.

धारणी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वादग्रस्त सर्वे न 126 वर मागील अनेक वर्षापासून अतिक्रमण धारकानी आपली दुकानं थाटून जागा हडपली आहे. नगरपंचायत महसुल तहसील व पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते अतिक्रमण सन 2020 मध्ये हटवून तेथे गुजरी बाजाराची निर्मिती करून आदिवासी बांधवासह इतर व्यपाऱ्यांसाठी बाजार ओटे व रस्ता तयार करून देण्याचे नगरपंचायत ने ठरवले. हे बांधकाम मागील चार महिन्या पासून सुरू झाले असून बाजार ओटे बांधकाम पूर्णत्वास आले आहे तर रस्त्याचे बांधकाम करणे सुरू असताना रस्त्यातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवून रस्ता बांधकाम करणे चालू आहे. या रस्ता बांधकामात रस्त्याच्या मध्ये डॉ. रमीज याचा ट्रॅक्टर उभा होता. त्यांना कंत्राटदाराने रस्ता बांधकाम करण्याकरिता ट्रॅक्टर हटविण्याची विनंती केली. मात्र ट्रॅक्टर जागेवरून हलणार नाही असे डॉ. रमीज म्हणले. ट्रॅक्टर रस्त्यावरून हटणार नसल्याने कंत्राटदाराने रस्ता काँक्रीटीकरण काम सुरू ठेऊन ट्रॅक्टर भवतीही काँक्रीटीकरण केले. विशेष म्हणजे ट्रॅक्टर मालकाने याबाबत कुठलाही आक्षेप नोंदविला नाही. चक्क ट्रॅक्टरसह रास्ता काँक्रीट झाल्याने धारणीत हा विषय कुतूहलाचा झाला आणि काँक्रीटीकरण झालेल्या सत्यावर फासलेला ट्रॅक्टर पहायसाठी गर्दी उसळली.
दरम्यान रस्त्याचे बांधकाम सुरू असताना आम्ही त्या ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर हटविण्याच्या वारंवार सूचना दिल्या त्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाला पण दिली.तरी सुद्धा ट्रॅक्टर हटविण्यात आला नाही. उलट त्यांनी तुम्ही आधी ट्रॅक्टरसह रस्त्याचे बांधकाम करा नंतरच आम्ही ट्रॅक्टर हटवू असे सांगितल्याचे कंत्राटदार मो शॉकत मो शकुर यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे. तर सदर टेकटर आम्हला त्या जागेवरून हटवायचा नसल्याने कंत्राटदारास बांधकाम करण्यचे आम्हीच सांगितले त्यानुसार त्याच्या बांधकाम केले असे ट्रॅक्टर मालक डॉ. रमीज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments