Home महाराष्ट्र रोहणीखेडा शिवारातील खोदकामात मिळाली तांब्याची ४०४ नाणी

रोहणीखेडा शिवारातील खोदकामात मिळाली तांब्याची ४०४ नाणी

अमरावती

धारणी तालुक्यातील रोहणीखेडा शिवारात एका शेतात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चर खोदण्याचे काम सुरू असताना, एका मजुराला तांब्याची यात नाणी मिळाली. ती नाणी महसूल व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली असून, पुढील कारवाईकरिता ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.
तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या रोहणीखेडा शिवारात बुढा तोट्या दहीकर यांचे टेकडीवर शेत आहे. त्या शेताच्या बांधावर चर खोदकाम सुरू होते. त्या कामाकरिता गावातील १८० मजुरांची उपस्थिती होती. मजूर रघुनाथ सोमा जावरकर व त्याची पत्नी खोदकाम करत असताना, त्यांना मातीच्या मडक्यातून मातीने माखलेली तांब्याची नाणी मिळाली. त्या दोघांनी ती नाणी कोणालाही माहिती होऊ न देता पिशवीमध्ये भरली व काम संपल्यावर ते दोघेही घराकडे पळायला लागले. अन्य मजुरांनी त्या दाम्पत्याला पिशवीत काय नेत आहे, हे वारंवार विचारले. पण, त्यांनी सांगण्यास नकार दिला. त्यातीलच एका मजुराला संशय आल्याने त्याने आणखी १५ मजुरांना घेऊन पुन्हा खोदकाम सुरू केले. तेथे त्याला एक नाणे मिळाले. त्यावरून रघुनाथला नाणी मिळाल्याची कल्पना मजुरांना आली. याबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले.
पिशवीत ४०३ नाणी
घटनास्थळावर नायब तहसीलदार अनिल नाडेकर व सराफ धुर्वे यांनी भेट देऊन एका मजुराला मिळालेले ते नाणे ताब्यात घेतले आणि गावात जाऊन रघुनाथचा शोध घेतला. रघुनाथने ती नाण्याची पिशवी छपराच्या लाकडाला बांधून ठेवली होती. त्यातील नाण्याचे मोजमाप केले असता, ती ४०३ नाणी भरली. एकूण ४०४ नाणी महसूल प्रशासनाने आयपीएस तथा ठाणेदार निकेतन कदम यांच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये ठेवली आहे.
नाण्यांवर उर्दू लिपी

जमिनीत असल्याने नाण्यांवर मातीचा घट्ट थर आहे. त्यावर उर्दू अक्षरात लिखाण केले असून, ती मुगलकालीन नाणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ती नाणी पोलीस प्रशासन सोमवारी धारणी येथील कोषागार कार्यालयात जमा करणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे ती सोपविली जातील. यानंतर ती नाणी ही किती वर्षांपूर्वीची, याचा उलगडा होणार आहे.
नाणी महसूल प्रशासनाकडे सोपविली
मजुरांना मिळालेली ४०४ तांब्याची नाणी महसूल प्रशासनाने आमच्याकडे सोपविली. ती नाणी कोषागार कार्यालयात जमा करण्यात येतील. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

निकेतन कदम, ठाणेदार, धारणी

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments