Home ताज्या घडामोडी पंतप्रधानांविरोधात ट्विट: 'गो एअर' कडून पायलटची हकालपट्टी

पंतप्रधानांविरोधात ट्विट: ‘गो एअर’ कडून पायलटची हकालपट्टी

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं पायलटला तडकाफडकी कामावरून काढून टाकले.

मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती.मलिक यांच्या या ट्विटमुळे वाद निर्माण झाल्याने मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.

“पंतप्रधानांबद्दल आणि इतर काही आक्षेपार्ह ट्विटबद्दल मी माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही,” असं सांगत मलिक यांनी माफीही मागितली आहे.

दरम्यान, या प्रकरणी गोएअरने मलिक यांना तडकाफडकी कामावरून कमी केलं आहे. “गोएअरची अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारण आहे. गोएअरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचं, कायद्यांचं आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचं पालन करणे बंधनकारक आहे,” असं गोएअरच्या प्रवक्त्यांनी या कारवाईबद्दल बोलताना सांगितलं.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments