Home ताज्या घडामोडी जकार्ताहुन उडालेले विमान समुद्रात कोसळले; 62 जणांना जलसमाधी

जकार्ताहुन उडालेले विमान समुद्रात कोसळले; 62 जणांना जलसमाधी

जकर्ता
जकार्ताहून पॉण्टिआनलका जाणाऱ्या श्रीविजया एअरच्या देशांतर्गत विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच हवाई वागतूक नियमंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. प्रसारमाध्यामांच्या माहितीनुसार उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भिती वर्वण्यात येत आहे

इंडोनेशियाचे परिवहन मंत्र्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना विमानातील लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, मच्छिमारांना समुद्रात विमानाचे काही अवशेष मिळाले आहेत. तसेच शरीराचे अवयव, कपडे आणि इतर काही विमानातील गोष्टींही मिळाल्या आहेत. या सर्वांना पुढील तपासासाठी इंडोनेशियाच्या आधिकाऱ्यांकडे सपूर्द करण्यात आलं आहे. यावरुन विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.इंडोनेशियाचे परिवहनमंत्री बुदी कारया सुमादी यांनी सांगितले की, एसजे १८२ या विमानाने नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने म्हणजेच स्थानिक वेळेनुसार दोन वाजून ३६ मिनिटांने उड्डाण केले. त्यानंतर चार मिनिटांनी हे विमान रडार यंत्रणेवरुन बेपत्ता झाले.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments