Home ताज्या घडामोडी कोरोना लसीकरण: पंतप्रधान साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

कोरोना लसीकरण: पंतप्रधान साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार असून, जगातील या सर्वात मोठय़ा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसह करोनाविरोधी आघाडीवरील सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील करोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची कितपत तयारी झालेली आहे, याचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत.

लसीकरण तयरिसंदर्भात विस्तृत आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू इत्यादी सणांच्या पाश्र्वभूमीवर लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असे केंद्र सरकारतर्फे शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

‘सीरम इन्स्टिटय़ूट’ने तयार केलेली ऑक्सफर्डची ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींना भारताने अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. या दोन्ही लशी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments