Home ताज्या घडामोडी शेतकरी आंदोलनाच्या नावावर ते पसरवत आहेत बर्ड फ्लू; भाजप आमदाराचा आरोप

शेतकरी आंदोलनाच्या नावावर ते पसरवत आहेत बर्ड फ्लू; भाजप आमदाराचा आरोप

नवी दिल्ली

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे बर्ड फ्लूचा आजार देशभरामध्ये पसरेल अशी विचित्र शक्यता या भाजपा आमदाराने व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रामगंज मंडीचे आमदार मदन दिलावर यांनी हा दावा केल्याचे दिसत आहे. अशाप्रकारे आंदोलन करणारे लोकं हे दहशतवादी, चोर आणि चोऱ्यामाऱ्या करणारे असू शकतात, असा आरोप दिलावर यांनी केला आहे.

ते बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत. ते ड्रायफ्रूट्स खात आहेत. तसेच ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. अनेकदा ते त्यांचा अवतारही बदलत आहेत. या आंदोलकांमध्ये अनेक दहशतवादी असू शकतात. अनेक चोर, लूटमार करणारेही असू शकतात. हे लोकं शेतकऱ्यांचे शत्रू असू शकतात,” असा दावा दिलावर यांनी व्हिडीओमध्ये केला आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशाची किंवा येथील लोकांची चिंता नसल्याचा आरोपही दिलावर यांनी केला आहे. शेतकरी आंदोलन हे एखाद्या पिकनिकप्रमाणे सुरु असल्याचा टोलाही दिलावर यांनी लगावला आहे. “माझ्या अंदाजानुसार चर्चेतून किंवा बळाचा वापर करुन पुढील काही दिवसांमध्ये सरकारने या आंदोलकांना हटवलं नाही तर देशभरात बर्ड फ्लूचा फैलाव होऊ शकतो,” असंही दिलावर म्हणाले आहेत. दरम्यान दिलावर यांच्या या भूमिकेबाबत विरिधकांनी टीका केली आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंदसिंग दोस्तारा यांनी दिलावर यांचे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments