Home ताज्या घडामोडी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अपघात, पत्नी आणि अंगरक्षक ठार

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अपघात, पत्नी आणि अंगरक्षक ठार

अंकोला( कर्नाटक)

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाला. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला .केंद्रात मंत्री असलेले ६८ वर्षीय श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील भाजपचे खासदार आहेत. नाईक यांच्यावर केंद्रात आयुष मंत्रालयाची तसेच संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments