Home ताज्या घडामोडी सुधारित कृषी कायद्याबाबत मंगळवारी निर्णय

सुधारित कृषी कायद्याबाबत मंगळवारी निर्णय

नवी दिल्ली

केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या सुधारित कृषी कायद्यांच्या संविधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. त्याआधी न्यायालयाने सोमवारी शेतकरी आंदोलनाशी संबंधित सर्व याचिकांवर सुनावणी घेतली. तसेच केंद्र सरकारला यावरुन फटकारताना या कायद्यांची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश दिले.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारताना म्हटलं की, “आम्हाला माहिती नाही की सरकार या कायद्यांवर कशा प्रकारे काम करत आहे. जर तुमच्यात समजुतदारपणा असेल तर या कायद्यांची अंमलबजावणी करु नका. आम्ही याच्या अंमलबजावणीला स्थगिती देत आहोत” मात्र, यानंतर शेतकरी आंदोलन थांबवतील का? असा सवालही यावेळी न्यायल्याने केंद्र सरकारला केला.

शेतकरी आंदोलनांवरील याचिकांवर सोमवारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सरकारच्यावतीनं बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना स्पष्टपणे सांगितलं की, आपण या कायद्यांवर स्थगिती आणणार की आम्हीच याला स्थगिती देऊ. या खंडपीठामध्ये न्या. एस. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. सुब्रमण्यम हे देखील सहभागी होते.
१५ जानेवारीला सरकार-शेतकऱ्यांमध्ये पुढील चर्चा
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये १५ जानेवारी रोजी पुढील बैठक पार पडणार आहे. ७ जानेवारी रोजी झालेल्या आठव्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नव्हता. केंद्र सरकारने कायदा रद्द करण्याला नकार दिला आहे. तर शेतकरी नेत्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ अशी भूमिका घेतली आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments