Home Uncategorized अमरावती महानगर पालीका आयुक्त थोडं लक्ष द्या

अमरावती महानगर पालीका आयुक्त थोडं लक्ष द्या

राहुल माटोडे

अमरावती महानगर पालीकेचा सर्वात बदनाम असलेला विभाग म्हणजे अतिक्रमण विभाग.बदनाम यासाठी म्हटल की नेहमी या विभागाची कार्यप्रणाली वादग्रस्त आणि दुजाभाव, एकतर्फी, ज्याला मराठीत तोंड पाहुन काम करणे असे म्हणतात या सर्व प्रकारची कारवाई या विभागाकडून सदैव केली जाते.विषेश म्हणजे मोठी फिल्डिंग लागते या विभागात जाण्यासाठी. परंतु नियमाने पाहले तर अमरावती महानगर पालीकेच्या अतिक्रमण विभागाचा प्रमुख हा जुनियर इंजीनीयर हवा असतो. पण आमच्या अमरावती महापालिकेत नियमावर बोट ठेवुन काम करणारा आयुक्त गुडेवार यांच्या नंतर आला नाही अनं बाप जन्मी येनार पण नाही अस वाटतं.

तर… तोंड पाहुन कारवाई करणे म्हणजे काय?
तर तोंड पाहुन कारवाई म्हणजे शहरात जो कोणी व्यक्ती रस्त्यावर अतिक्रण करुन व्यवसाय,धंदा, करीत असेल तो जर अमरावती मनपा च्या कर्मचार्यांना स्वताचे मन मारुन, जिव दुखवुन, चिरीमिरी,किंवा मासिक हप्ता देत असेल तर तोच पट्या या शहरात मनात येईल तिथे कितीही जागा व्यापुन व्यवसाय करु शकतो अन्यथा बाकी लोकांनी तर रस्तावर बसुन आलू पोंगे सुद्धा विकणे हे मनपा च्या कारवाई मोडते. या सर्व गंभिर प्रकाराबद्दल शिवसेने, युवासेने, एका तक्रारीच्या माध्यमातुन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना अवगत करुन दिले कि मनपा अतिक्रमण विभागाचा वसुली बहाद्दर कर्मचारी उमेश सवई नामक कर्मचारी शहरातील गोरगरीबांन कडून आयुक्तांचे नाव सांगुन तुफान अवैध वसुली करीत आहे. आणि शहरात कारवाई करतांना दुजाभाव करीत आहे. तसेच वर तोंड करुन सरळ – सरळ लोकांना सांगत आहे की मला आयुक्तांना साभाळावे लागते म्हनुन हि वसुली करावी लागत आहे..

हिंन्दी मुव्हीतील डायलाँग मधे सांगायच झाल्यास….

जो हप्ता नही देंगा… वो रस्ते पै धंदा नही करेंगा…. और जो हप्ता देंगा उसे तो.. धक्का भी नही लगेंगा

नवल, आचर्य, एकाच गोष्टीचे वाटत आहे महापालिका आयुक्त पदावर बसलेले प्रशांत रोडे का म्हनुन या भ्रष्ट कार्यप्रणीच्या व्यक्तीला पाठीशी घालत आहे, का बचाव करीत आहे ?. हा उमेश सवई मनपा आयुक्त यांच्यासाठी किंवा त्यांच्या आदेशाने तर शहरातील अतिक्रमण ग्रस्त लोकांन कडून वसुली तर करीत नाही ना असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो.

महापालिकेतील भ्रष्ट प्रणाली चीड आणणारी आहे. यामुळे आक्रमक तृणनकडून केव्हा पण राग अनावर होऊन, आयुक्तां विरोधात संघर्ष होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व सुरळीत व्हावं. आयुक्तांनी लक्ष द्यावं. समजून घ्याव ही अपेक्षा.,

युवासेना शिवसेना अमरावती शहर

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments