Home ताज्या घडामोडी अमरावतीची ‘चिंगी’ राज्यस्तरावर देणार बाहुली नाट्याचे धडे; राष्ट्रीय खेळणी जत्रा : १३...

अमरावतीची ‘चिंगी’ राज्यस्तरावर देणार बाहुली नाट्याचे धडे; राष्ट्रीय खेळणी जत्रा : १३ जानेवारी ला बाहुली निर्मितीचे सादरीकरण

अमरावती

२७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान राष्ट्रीय खेळणी जत्रेचे आयोजन केले असून यामध्ये संपूर्ण देशातील बाल कलाकार सहभागी होऊन विज्ञान,गणित व ईतर विषयाशी संबंधित खेळण्याचे ऑनलाईन सादरीकरण करणार आहे.राज्यस्तरावरील विद्यार्थ्यांना बाहुल्याच्या माध्यमातून खेळणी कशी तयार करायची यासंदर्भात अमरावतीमधील प्राथमिक शिक्षिका ‘दीपाली बाभुळकर यांच्या ‘चिंगी व तिचा मित्रपरीवार’ प्रत्यक्ष बाहुली निर्मिती व नाटिकेचे धडे देणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे द्वारा आज (दिनांक १० जानेवारी) राज्यस्तरीय खेळणी निर्मिती उद्बोधन कार्यशाळाचा शुभारंभ झाला असून राज्यभरातील विद्यार्थ्यांना खेळणी निर्मिती संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा चार दिवस चालणार आहे.आज झालेल्या उद्बोधन कार्यशाळेत प्रसिद्ध विज्ञान खेळणी निर्माता अरविंद गुप्ता व बिईंग जिज्ञासुचे चे रजत अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. दिनांक १३ जानेवारी रोजी अमरावती च्या शिक्षिका दिपाली बाभुळकर ह्या त्यांच्या बाहुली नाट्याद्वारा संपूर्ण राज्यातील मुलांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहे.यापूर्वी त्यांच्या चिंगी,गुलबकावली,गणपती बाप्पा,मोटू-पतलू,चंपकलाल सारख्या बाहुल्यांनी अनेक समाजप्रबोधन पर विषयाद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले आहे.स्वच्छता अभियान,गुड टच बॅड टच,स्त्री पुरुष समानता,केलं वाचवा देश वाचवा,पर्यावरण संवर्धन, मुलींची सुरक्षितता,आदी अनेक विषय केवळ बाहुली नाटिकेद्वारे सादर करून लोकजागृती केली आहे.कोविड काळात सुद्धा वाचन समृद्धी,मिस्ड कॉल वर गोष्टी सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र सह मध्ये प्रदेश,छतीसगढ़,उत्तर प्रदेश मधील विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. गत महिन्यात त्यांची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली येथे साहित्य निर्मिती करिता निवड झाली असून यापूर्वी त्या अनेक पुरस्कार तथा नवोपक्रमाच्या मानकरी ठरलेल्या आहेत.

विदर्भातील एकमेव बाहुली कलाकार – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक दादासाहेब तीवाडे यांचे कडून बाहुलीनाट्य चे मार्गदर्शन घेवून गेल्या २० वर्षापासून बाहुलीनाट्य द्वारे समाजप्रबोधन करणाऱ्या दीपाली बाभूळकर ह्या विदर्भातील एकमेव महिला बाहुलीनाट्य कलावंत आहे. त्या सर फौंडेशन सोलापूर सह अमरावती मधील जेसीआय च्या पदाधिकारी म्हणून काम करत आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments