Home विदर्भ ओवी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी

ओवी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी

अमरावती

राजमाता माँ जिजाऊंची जयंती ओवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साजरी करणयात आली.
संस्थेच्या अध्यक्ष शरयू ठाकरे यांच्या अध्यक्षतेत असयोजित सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लेखिका आणि पत्रकार कांचन मुरके उपस्थित होत्या.

जिजाऊ दैववादी नसून प्रयत्नवादी होत्या हे आज प्रत्येक महिलेने लक्षात घेणे गरजेचे आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन कराव आणि शहाजीराजेंची संकल्पना पुर्णत्वास जावी यासाठी जिजाऊंनी कोणतेही व्रत वैकल्य केले नाही तर शिवाजी राजामध्ये संस्कार रूजवून त्यांना प्रेरणा दिली हे आम्ही समजून घेवून दैवावर विसंबून राहू नये असे वक्तव्य यावेळी कांचन मुरके यांनी केले. त्या ओवी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा शरयुताई ठाकरे वतीने त्यांच्या निवासस्थानी आयोजित जिजाऊ जयंती कार्यक्रमात ” इतिहासातील मर्दानी स्त्रिया आणि आजची स्त्री” या विषयावर बोलत होत्या पुढे बोलतांना त्यांनी घराघरात शिवाजी घडावा ही अपेक्षा ठेवत असतांना स्वत:हा जिजाऊ होणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
यावेळी जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण समाजसेविका सिंधू चव्हान यांच्या हस्ते करून करण्यात आली.यावेळी तूमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली कळमकर, प्रास्ताविक शरयू ठाकरे व आभार सुचिता लहाने यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आरती बोंदरकर ,किरण ठाकरे, उज्वला जुमळे, संगीता बाखडे, अनीता गावंडे, मृणाल नवरंगे, कुंदा पुसदकर, पुजा तीवारी यांसह परिसरातील मंडळी माेठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments