Home ताज्या घडामोडी धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात

धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात

मुंबई

धनंजय मुंडे यांना दोन पत्नी असल्याचा वाद समोर येताच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला नाही, असा दावा करत याप्रकरणाची मुंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली असून यामुळे धनंजय मुंडे यांची आमदारकी संकटात सापडण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात सोमय्या यांनी म्हटलं, मी या पत्रासोबत महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यासंबंधीची काही कागदपत्रे जोडली आहेत. त्यानुसार, मुंडे यांनी आपण दोनदा लग्न केल्याचं जाहीर केलं असून दोन्ही पत्नींची आणि मुलांची काळजी घेत असल्याचंही जाहिररित्या म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची बहिण रेणू शर्मा यांनी काल मुंबई पोलिसांमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मुंडे यांनी या तक्रारीनंतर आपली बाजू मांडताना फेसबुकवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आपण दोन्ही पत्नींच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे. तसेच त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना त्यांनी आपलं नाव दिलं असून ते त्यांचं पालनपोषणही करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी रेणू शर्मा आणि आपल्यात जवळचे संबंध असल्याचंही मान्य केलं आहे, असं सोमय्या यांनी पत्रात म्हटलं आहे.

मात्र, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना ऑक्टोबर २०१९मध्ये आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची तसेच सर्व मुलांची माहिती आणि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती लपवली होती, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments