Home Uncategorized नवाब मलिक यांच्या जवायाला अटक; एनसीबीची कारवाई

नवाब मलिक यांच्या जवायाला अटक; एनसीबीची कारवाई

मुंबई

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून त्यांची एनसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. आरोपी करन सजनानीच्या चौकशीमध्ये समीर खान यांचं नाव आल्याने एनसीबीनं त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं.

ब्रिटीश नागरिक असलेल्या करन सजनानी याला समीर खान यांनी गुगल पे द्वारे २० हजार रुपये पाठवले होते. हे पैसे ड्रग्जसाठी पाठवल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. खान हे करन सजनानीच्या नेहमी संपर्कात होते. याबाबत एनसीबीने त्यांची चौकशी सुरु केली आहे. उद्या खान यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करन सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करन सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments