Home ताज्या घडामोडी धनंजय मुंडे प्रकरण; पोलिसांनी सत्य उघड करावं : देवेंद्र फडणवीस

धनंजय मुंडे प्रकरण; पोलिसांनी सत्य उघड करावं : देवेंद्र फडणवीस

मुंबई

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबत नेमकं काय सत्य आहे ते पोलिसांनी सत्य उघड करावं अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे. आपण न्यायालयात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्यांकडून राजीनाम्याची मागणी

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपानं आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments