Home महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या उपस्थितीत राज्यातील इतर मागास बहुजन बांधवांच्या प्रश्नावर चर्चा

राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या उपस्थितीत राज्यातील इतर मागास बहुजन बांधवांच्या प्रश्नावर चर्चा

मुंबई,

राज्यातील इतर मागास बहुजन नागरिकांच्या विविध प्रश्नांवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपुर्ण चर्चा झाली.

इतर बहुजन मागासवर्गीय बहुजन कल्याण समाजातील नागरिकांच्या उपजातींना लखेरिया ऐवजी लखेरा नावानेच जात प्रमाणपत्र दिले जावे, तसेच त्यासाठी सर्व जाती व उपजाती यांचे समाजप्रबोधनासाठी विशेष शिबीर आयोजित करावे, वडार समाजातील सुशिक्षित बेरोजगार बांधवांच्या रजिस्ट्रेशन सोसायट्यांना तांडा वस्तींची कामे प्राधान्याने दिली जावीत, राज्यस्तरिय ओबीसींच्या सर्व जाती/उपजातींचे पुर्वीचे व आत्ताच्या व्यवसाय आधारीत जनगणना केली जावी व तशी सुचीच तयार करावी यावर चर्चा झाली.

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.बैठकीला लखेरा समाजाचे प्रतिनिधी एम.एच.मणियार,वैदर्भीय नाथ समाजाचे राज्याध्यक्ष एकनाथ पवार, राज्य वडार समाज समन्वय समितीचे राज्याध्यक्ष विजय चौगुले यांच्यासह विभागाचे अतिरीक्त सचिव, सह सचिव व पुण्याचे विभागिय संचालक आदी उपस्थित होते. या बैठकीत औबीसींच्या सर्व उपजातींचे पुर्वीचे व आत्ताच्या व्यवसायांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सर्वेक्षणाचा हा खर्च जिल्हा नियोजनमधून करण्यावर देखील चर्चा झाली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments