Home ताज्या घडामोडी इंडोनेशियात भूकंप

इंडोनेशियात भूकंप

जकार्ता

इंडोनेशियाल शुक्रवारी भूकंपाचा मोठा हादरा बसला . रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता ६.२ इतकी होती. या भूकंपामध्ये एका मोठ्या रुग्णालयाची इमारत कोसळली असून त्याखाली अनेक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत या भूकंपामध्ये कोसळली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रुग्णालय कोसळलं आहे, अशी माहिती बचाव कार्याच्या कामात असलेल्या पथकातील अरिंतो या व्यक्तीने दिल्याचे वृत्त एएफपीने दिलं आहे. मामुजू शहरामध्ये ही दूर्घटना घडली आहे. “या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारी अडकले आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत,” असंही अरिंतोने म्हटलं आहे. मात्र नक्की किती रुग्ण आणि कर्मचारी या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकलेत यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments