Home विदर्भ वरुड, मोर्शी तालुयातील वाहनधारकांना नांदगाव पेठ टोल नाक्यावर सवलत

वरुड, मोर्शी तालुयातील वाहनधारकांना नांदगाव पेठ टोल नाक्यावर सवलत

अमरावती

वरुड व मोर्शी तालुक्यातील वैयक्तीक वाहनधारकांना नांदगाव पेठ येथील आयआरबी टोल नाक्यावर सवलत मिळणार आहे. आता 25 टक्केच टोल त्यांना भरावा लागणार असून शुक्रवार 15 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हा निर्णय घेतला.
नागपूर – अमरावती मार्गावरील नांदगाव पेठ जवळच्या टोल नाक्यावर मोर्शी व वरुड येथील नागरिकांनाही पूर्ण टोल द्यावा लागत होता. महामार्गाचा फक्त 5 ते 6 किलोमीटर वापर करत असताना पूर्ण टोल घेण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विरोधात टोल मुक्ती कृती समिती आवाज बुलंद करीत आहे. वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी आंदोलनही केले. 16 जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थाना समोर व 25 जानेवारीला टोल नाक्यावर निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला होता. त्याची दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस व भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी गुरुवारी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची भेट केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासोबत करून दिली आणि प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली. गडकरी यांनी लगेच भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. वरुड आणि मोर्शी येथील नागरिकांच्या वैयक्तीक वाहनांना टोलमधून 75 टक्के सवलत देण्याचे निर्देश दिले. त्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून शुक्रवार 15 जानेवारीपासूनच टोल सवलत लागू करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अमरावती येथील प्रकल्प प्रमुख ब्राम्हणकर यांनी तसे लेखी पत्र कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना शुक्रवारी दुपारी दिले. तत्पूर्वी कृती समिती पदाधिकार्‍यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र त्यांना दिले. टोल सवलत मिळण्यासाठी वरुड व मोर्शी येथील नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये ज्या वाहनांचा समावेश झालेला नाही त्या सर्व वाहनांचा समावेश होण्यासाठी व ही सुट 10 टक्के पर्यंत करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्वासनही देण्यात आले आहे. यावेळी खासदार तडस यांचे स्विय सहायक राजेंद्र हजारे, कृती समितीचे विशाल तिजारे, अ‍ॅड. आशिष टाकोडे, प्रा. संजय पांडव, प्रदीप बाजाड, योगेंद्र पोहोकार, जितेंद्र बुरंगे, भय्या साबळे, अब्दुल नईम, रजत पांडव उपस्थित होते.
नितीन गडकरी यांचे आभार
मोर्शी व वरुड मार्गावरील खाजगी वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्गावरील नंदगावपेठ टोल नाक्यावर 75 टक्के सवलत जाहीर केल्या बद्दल खासदार रामदास तडस यांनीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानले असून सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे. दोनही तालुक्यातल्या नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची सदर मागणी होती. गडकरी यांनी सवलतीचे आश्वासन पूर्वीच दिले होते. त्यानुसारच त्यांनी निर्णय घेतला आहे. पुढील काळात टोल धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. आपण जितका महामार्गाचा वापर करू तितकाच टोल घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नेतृत्वाखाली तयार होऊन आपल्या सेवेत लवकरच येईल, असा विश्वास आहे.
-रामदास तडस खासदार, वर्धा

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments