Home विदर्भ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान

अमरावती

जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारी साडेतीनपर्यंत 59.19 टक्के मतदान झाले.

निवडणूकीच्या शेवटच्या दोन तासांत केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मतदानाच्या वेळेत केंद्रात उपस्थित झालेल्या सर्वांना मतदानाची संधी मिळाली. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान चालले. त्यामुळे शेवटच्या दोन तासांतील आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही. तरी अंदाजे 80 टक्क्यांच्या आसपास मतदानाची टक्केवारी पोहोचल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

मतदानासाठी आज गावागावांतून मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. नवमतदार तरूण- तरूणी, ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग बांधव यांनीही उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच निवडणूक केंद्रावर दक्षतेची खबरदारी घेण्यात आली होती. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना दर्शनी भागात व केंद्रावर देण्यात येत होत्या. कोविड संशयितांसाठी विलगीकरण कक्षही केंद्रावर उघडण्यात आला होता.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments