Home विदर्भ कोविड लसीकरणाचा शनिवारी शुभारंभ

कोविड लसीकरणाचा शनिवारी शुभारंभ

अमरावती

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ उद्या १६ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मुंबईतील विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (शनिवार १६ जानेवारी) सकाळी ११.३० वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.

जिल्ह्यातही उद्यापासून लसीकरण सुरू होईल. लसीकरणासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर प्रत्येकी 100 लाभार्थ्यांप्रमाणे 500 लाभार्थ्यांना लस दिली जाईल.

याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. या लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे 17 हजार लसींचा डोस प्राप्त आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments