Home विदर्भ सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक सुविधांचे प्रस्ताव द्यावे-जिल्हाधिकारी शैलेश नवाल

सक्षम आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक सुविधांचे प्रस्ताव द्यावे
-जिल्हाधिकारी शैलेश नवाल

नवसंजीवनी योजनेचा आढावा

अमरावती

मेळघाटात सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण होण्यासाठी आवश्यक सुविधांबाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चिखलदरा येथे दिले.
नवसंजीवनी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने, धारणीचे तहसीलदार अतुल पाटोळे व मेळघाटातील सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे, मातामृत्यू व बालमृत्यू रोखणे हे आपल्यापुढचे प्रश्न आहेत. त्यादृष्टीने सक्षम व सर्वदूर सातत्यपूर्ण सेवा देणारी भक्कम आरोग्य यंत्रणा उभी राहिली पाहिजे. आरोग्य यंत्रणेतील मेळघाटात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व सुविधा शासनाकडून मिळवून दिल्या जातील. मात्र, सेवा व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची ही येथे प्रत्यक्ष काम करणाऱ्या सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे येथील गरजा व स्थिती आवश्यक सुविधा व नव्याने करावयाची कामे याबाबत परिपूर्ण प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

वैद्यकीय अधिकारी, कम्युनिटी हेल्थ अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी सातत्यपूर्ण संवाद ठेवावा. इतर विभागांशीही समन्वय राखावा. स्थलांतर रोखण्यासाठी मनरेगांतर्गत अधिकाधिक कामे राबवावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments