Home ताज्या घडामोडी अमेरिकी संसदेलगत आढळला शस्त्रसाठा; एकला अटक

अमेरिकी संसदेलगत आढळला शस्त्रसाठा; एकला अटक

वॉशिंग्टन

अमेरिेकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यावर हिंसाचाराचे सावट असताना एका व्यक्तिला पोलिसांनी बंदूक आणि ५०० काडतूसांसह अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तिकडे बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याची खोटी प्रवेशपत्रिकाही आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
नाव वेस्ले ए बिलर (३१ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. आहे. आरोपीने बंदूक आणि काडतूसे ट्रकमध्ये लपवली होती. अटक केल्यानंतर बिलरने आपण ही बंदूक आणि काडतूसे चुकून आणली असल्याचे सांगितले. आपण वॉशिंग्टनमध्ये एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम करत आहोत. कामावर जाण्यास उशीर होत असल्यामुळे घाईगडबडीत गाडीमध्ये शस्त्र असल्याचे विसरलो, असा बचाव त्याने केला आहे. बिलर एक कंत्राटदार म्हणून काम करत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पार्क पोलिसांनी त्याला ओळखपत्र दिले होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांना त्याची ओळख पटली नाही.

तपास यंत्रणांनी सांगितले की, बिलरचा कोणत्याही अतिकट्टरवादी गटांशी जुने संबंध नाहीत. बिलरवर सध्या परवान्याशिवाय शस्त्रं बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, बिलर रोखण्यात आले तेव्हा त्याच्याजवळ शस्त्र असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याच्याजवळून ९ एमएम हॅण्डगनची काडतूसे जप्त केली आहेत.बायडन यांचा शपथविधी सोहळा २० जानेवारी रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यावर ट्रम्प समर्थकांकडून होणाऱ्या हिंसाचाराचे सावट आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे अमेरिकेच्या संसद इमारतीत ६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या शपथविधी दरम्यान पुन्हा एकदा हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी ट्रम्प समर्थकांच्या हाती शस्त्रदेखील असण्याचा इशारा एफबीआयने दिला आहे. .

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments