Home ताज्या घडामोडी  एसटी बस पुलावरून नदीत कोसळली, 20 जण जखमी

 एसटी बस पुलावरून नदीत कोसळली, 20 जण जखमी

अमरावती

वरूड तालुक्यातील वरूड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ढगा लगत एसटी बस ने ट्रँक्टर ला धडक देउन पुलावरून नदीत कोसळली. यामधे 25 ते 30 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना सायंकाळी सात वाजता घडली.

एसटीची ट्रॅक्टरला धडक लागुन बस पुलाखाली कोसळल्याची घटना नागपूर वरूड मार्गावरील ढगा येथे घडली आfहे प्राप्त माहिती नुसार काटोल आगाराची नागपूर वरूड बस क्र. एम एच 40 ऐ क्यू 6056 वरूड कडे येत होती. सायंकाळी सात वाजताचे दरम्यान ढगा लगत सदावर्ती नदीच्या पुलावर समोरून ट्रँक्टर क्र. एम एच 27एल 298 असा तुटक क्रमांकाचा ट्रँक्टर ला धडक मारली .तर एस टी बस पुलाचे कठडे तोडून सदावर्ती नदीत पडली. यामधे 25 ते 30 प्रवाशी वाहक आणि ट्रँक्टर चालक जखमी झाला. ही घटना सायंकाळी 7 वाजता घडली. तात्काळ ग्रामस्थांनी जखमीला बाहेर काढून आमणेर आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तर गंभीर जखमींना अमरावती पाठविण्यात आले. व्रूत्त लिहेपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाही. घटनास्थळावर ठाणेदार श्रेणिक लोढा सह शेकडो पोलीस तसेच राज्य परिवहन वरूड आगाराचे प्रमुख जीवन वानखडे तैनात झाले होते .तर आमदार देवेंद्र भुयार यांनी कार्यक्र्त्यासह घटनास्थळाला भेट देउन जखमींना उपचाराकरिता पाठविले. जखमींना एसटी महामंडळाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments