Home ताज्या घडामोडी ग्रामपंचायत निवडणूक;   अमरावती जिल्ह्यात संमीश्र कौल

ग्रामपंचायत निवडणूक;   अमरावती जिल्ह्यात संमीश्र कौल

अमरावती

जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीने अनेक भागात वर्चस्व कायम ठेवले असले, तरी काही ठिकाणी आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमीश्र आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या मोझरी गावातील सत्ता कायम राखली असली, तरी त्यांच्या मतदार संघात अनेक ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षालाही त्यांच्या मतदार संघात फटका बसला, मात्र काँग्रेसने वर्चस्व मिळवले. मोर्शी तालुक्यात बहुतांश ठिकाणी माजी कृ षिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील गटाने भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली . बडनेरा मतदार संघात अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.
जिल्ह््यातील ग्रामीण भागातील  हा कौल जिल्ह््यातील राजकारणासाठी महत्वाचा मानला जात आहे. मोझरीतील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी ७ जागा जिंकू न वर्चस्व मिळवले, पण त्यांच्या गटाला सत्ता काबिज  करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. गेल्या दहा वर्षांपासून गावात काँग्रेसची सत्ता आहे. त्यांच्या तिवसा मतदार संघातील इतर निकाल मात्र संमीश्र स्वरूपाचे आहेत. अनेक गावांमध्ये काँग्रेसला सत्ता गमावावी लागली आहे. या ठिकाणी भाजपने झेप घेतली आहे.
अचलपूर तालुक्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले असून ४४ पैकी २४ ग्रामपंचायतींवर काँग्रेस गटाने झेंडा फडकविल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी के ला आहे. चांदूर बाजार तालुक्यातही ४१ पैकी ३२ जागा जिंकू न काँग्रेसने इतर पक्षांच्या तुलनेत चमकदार कामगिरी के ल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अचलपूर तालुक्यातील पथ्रोट ग्रामपंचायत भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे.
दर्यापूर तालुक्यात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वातील गटाने बºयाच ठिकाणी विजय मिळवला आहे, मात्र अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनेक ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. अमरावती तालुक्यात संमीश्र निकाल असले, तरी  अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित के ले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही चांगली कामगिरी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे यांचे म्हणणे आहे. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यातील निकाल संमीश्र स्वरूपाचे आहेत. आमदार रवी राणा यांच्या बडनेरा मतदार संघात भातकु ली तालुक्यात १६ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments