Home ताज्या घडामोडी बहुचर्चित प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांड; आरोपीस आजन्म कारावास

बहुचर्चित प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांड; आरोपीस आजन्म कारावास

अमरावती

अमरावती शहरातील बहुकचर्चित प्रतिक्षा मेहेत्रे हत्याकांडातील आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आज बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही धक्कादायक घटना 23 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात घडली होती.

 राहुल बबन भड (27 रा. मुदलीयारनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, 23 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 12.30 वाजता प्रतिक्षा मुरलीधर मेहेत्रे (24, छाबडा प्लॉट) ही एका मैत्रिणीसोबत दुचाकीने साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन दोघीही घरी परत निघाल्या होत्या. मार्गात दुचाकीवरून आलेल्या राहुल भडने ओव्हरटेक करीत त्यांना अडविले. यावेळी प्रतिक्षा व राहुल यांच्यात बोलचाल सुरु होती. दरम्यान, राहुलने अचानक पाठीवरील बॅगमधून चाकू काढून प्रतिक्षावर हल्ला केला. त्यामुळे प्रतिक्षा रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळली. तर तिची मैत्रिण मदतीसाठी आरडाओरड करीत होती. मैत्रिणीने तातडीने ओंकार मंदिर गाठून घटनेची माहिती तेथील रहिवासी राजेंद्र येते यांना दिली. राजेंद्र येते यांनी एका महिलेसह घटनास्थळ गाठून प्रतिक्षाला एका चारचाकी वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रतिक्षाला मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळाल्यावर प्रतिक्षाचे वडिल जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल भडविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. 

सदर घटनेनंतर राहुल भड दुचाकीने दिग्रसला गेला. तो तेथील एका लॉजवर पंधरा मिनीट थांबला. पार्कींगमध्ये दुचाकी उभी करून, त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो मूर्तिजापूर रेल्वेस्थानकाजवळील रुळावर जाऊन झोपला. दरम्यान राजापेठ पोलीस राहुल भडच्या शोधात मूर्तिजापूर पोहोचले. पोलिसांनी पहाटे 4 वाजता राहुलला रेल्वे रुळावरून अटक केली. या प्रकरणी

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास पूर्ण करून 20 फेब्रुवारी 2018 रोजी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयात एकूण सात साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आरोपी राहुल भडला आजन्म कारावास,  5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी यशस्वी युक्तीवाद केला.

बॉक्स

प्रतिक्षाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई 

प्रतिक्षा मेहेत्रे हिच्या कुटुंबीयांना फौजदारी संहितेच्या कलम 357 नुसार न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत या संबंधित प्रक्रिया केली जाणार आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments