Home ताज्या घडामोडी कोविड मुळे अमरावतीकरांसाठी 'मालमत्ता कर अभय योजना'

कोविड मुळे अमरावतीकरांसाठी ‘मालमत्ता कर अभय योजना’

अमरावती
महापालिकेच्यावतीने ३१ डिसेंबर रोजी थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या रकमेवर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येतो; परंतु चालू आर्थिक वर्षात उद्भवलेल्या कोविडच्या संकटाची अपवादात्मक स्थिती लक्षात घेता ३१ डिसेंबर २०२० रोजी आकारण्यात आलेल्या व्याज व दंडाच्या रकमेपैकी ८० टक्के रक्कम माफ करण्याबाबतचा ठराव आज, बुधवारी महापालिकेच्या सभागृहाने मंजूर केला. या अपवादात्मक योजनेचे ‘मालमत्ता कर अभय योजना’ असे नामकरण करण्यात आले आहे.

दंडाची लाखो रूपयांची थकबाकी असल्याने महापालिकेच्या आमसभेत नगरसेवक तुषार भारतीय यांनी याबाबतचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, प्रकरण ८ मधील नियम ४१ अन्वये महापौर तथा सभापती चेतन गावंडे यांनी या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानुसार दंडाची रक्कम १५ मार्च २०२१पूर्वी एकाच टप्प्यात भरणा करणे मालमत्ताधारकास अनिवार्य असेल. तसेच विहित मुदतीत कराचा भरणा न केल्यास या ठरावाद्वारे दिलेली सूट आपोआप रद्द होईल. त्यानुसार ही योजना २५ जानेवारी ते १५ मार्च २०२१पर्यंत राहील. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करावी, असे निर्देश महापौरांनी दिले. मालमत्ताकरापोटी महापालिकेला ४७ कोटी ८१ लाख रूपये मिळणे अपेक्षित आहे; मात्र त्यापैकी केवळ २० कोटी रूपयांचीच वसुली झाली असल्याची माहिती कर मूल्यांकन अधिकारी महेश देशमुख यांनी दिली. या रकमेतही सहा ते सात कोटी रक्कम व्याज व दंडाची आहे. व्याजासह एकूण कराची रक्कम वाढत गेल्यावर मालमत्ताधारक केवळ मुद्दल भरतात किंवा मुद्दलही पूर्ण भरत नाही. त्यातही अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे करवसुली करीत नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सुट देऊन थकबाकीदारांकडून मुद्दलाची रक्क्म भरून घ्यावी, अशी मागणी तुषार भारतीय यांच्यासह चेतन पवार, प्रकाश बनसोड, विलास इंगोले, प्रदीप हिवसे, बबलू शेखावत आदींनी केली होती

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments