Home विदर्भ मोबाईल गॅलरीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक

मोबाईल गॅलरीत चोरी करणाऱ्या दोघांना अटक


अमरावती

जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील दोन मोबाईल गॅलरी फोडून चोरी करणार्या एका अल्पवयीनास पोलिसांनी ताब्यात घेऊन एका आरोपीला परतवाड्यातून अटक केली. 17 जानेवारी रोजी मध्यरात्री गांधीनगर परिसरातील भाईजी मोबाईल गॅलरी व बस स्थानकासमोरील लक्ष्मी मोबाइल गॅलरी फोडून चोराने 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि दर्यापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

सीसीटीव्हीत झाले होते कैद


तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आल्यानंतर दर्यापूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना परतवाडा येथून ताब्यात घेतले. आरोपींमध्ये राजा मावस्कर (30 रा. बोरगाव, मध्य प्रदेश) आणि एका 14 वर्षीय अल्पवयीनाचा समावेश आहे. या चोरीप्रकरणातील आरोपी अनिल काळमा धुर्वे (21 रा. मध्यप्रदेश) हा फरार आहे. पोलिसांनी अल्पवयीनाला अमरावती येथील बालगृहात पाठविले आहे. ही कारवाई ठाणेदार प्रमेश आत्राम, पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंडारे, पोलीस निरीक्षक प्रिया उमाटे, पोलीस शिपाई सौरभ धरमठोक, सैनिक विनोद वाकपांजर यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments