Home विदर्भ कुख्यात चोराने दिली 13 घरफोड्यांची कबुली;6 लाख 38 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल...

कुख्यात चोराने दिली 13 घरफोड्यांची कबुली;
6 लाख 38 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती

नागपुरी गेट पोलिसांनी एका कुख्यात चोराला अटक करून, त्याने शहरातील 13 घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जब्बार खान रऊफ खान (22 रा. अन्सारनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा एकुण 6 लाख 38 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
असा मुद्देमाल जप्त
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने नागपुरी गेट पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा कसुन तपास सुरु केला होता. दरम्यान पोलिसांनी शास्त्रोक्त पध्दतीने तपास करून आरोपी निष्पन्न केला. पोलिसांनी आरोपी जब्बार खानला अटक करून, त्याच्याजवळून 91 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 20 ग्रॅमची चांदी, 1 लाख 41 हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकुण 6 लाख 38 हजार 164 मुद्देमाल जप्त केला. पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments