Home ताज्या घडामोडी अर्णब गोस्वामी देशद्रोही; कॉग्रेसचा आरोप, कारवाईची मागणी

अर्णब गोस्वामी देशद्रोही; कॉग्रेसचा आरोप, कारवाईची मागणी

अमरावती

पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे व्हाट्सअ‌ॅप चॅटिंग सार्वजनिक झाली असून त्याच्या या चॅटिंगमध्ये त्याला बालाकोट हल्ल्याची माहिती असल्याचे पुढे आले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून अर्णबला अटक करत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आज काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. अमरावती शहरातही काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आले.

पुलवाम येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याची माहिती पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि सेनाप्रमुखांशिवाय कुणाला नसायला पाहिजे. असे असताना ही गुपित माहिती तीन दिवसांपूर्वी पत्रकार अर्णब गोस्वामीला मिळाली होती. तसेच त्याने ही माहिती व्हाट्सअ‌ॅपवर शेअर केली. हा धक्कादायक प्रकार असून अर्णब गोस्वामीवर त्वरीत गुन्हा दाखल करत त्याला अटक करावी, तसेच या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसच्यावतीने शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी केली आहे.

बालाकोटवर भारत हवाई हल्ला करणार आणि याचा फायदा एका मोठ्या व्यक्तीला होणार, असा उल्लेख अर्णबच्या व्हाट्सअ‌ॅप संभाषणात आहे. आता या हल्ल्याचा फायदा नेमका कोणाला झाला, असा प्रश्नही बबलू शेखावत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळो आमदार सुलभा खोडके, विलास इंगोले, वंदना कंगले, सागर देशमुख, सागर कलाने आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments