Home ताज्या घडामोडी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (२३ जानेवारी) त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments