Home ताज्या घडामोडी मेळघाटात मुलींच्या वस्तीगृहात दारूची निर्मिती, 10 जणांना अटक

मेळघाटात मुलींच्या वस्तीगृहात दारूची निर्मिती, 10 जणांना अटक

अमरावती

मुलींच्या वसतीगृहात देशी व विदेशी दारू काढत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीच्या मेळघाटमधील सेमाडोह येथे समोर आला आहे. शासन अनुदानित जय महाकाली या मुलींच्या शासकीय वसतीगृहात चक्क अवैध दारू तयार करत होती.माहितीच्या आधारावर अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि चिखलदरा पोलिसांनी या वसतीगृहात संयुक्त कारवाई करत छापा टाकून १० आरोपींना अटक केली आहे.

अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा परिसरात पेट्रोलिंग करत असतानाच सेमाडोह येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहात बनावट देशी व विदेशी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच आधारे पोलिसांनी छापा टाकून या टोळीला रांगेहाथ पकडून त्यांच्याकडून तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात बनावट दारू, वाहन, मोबाईल आदी वस्तूंसह एकूण १७ लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. आरोपींमध्ये वसतीगृह अधीक्षकाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मुलींच्या वसतीगृहात चालणारा हा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईमुळे समोर आला आहे. यानंतर खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १ हजार लिटर अल्कोहोल, एका स्टील कोठीमध्ये पाणी मिश्रित अल्कोहोल, मिनरल वॉटरचे ३६ कॅन, रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या मोटार, बोलेरो गाडी, कार, १२ मोबाईल, ३ हजार रुपये नगदी असा एकूण जवळपास १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १० आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये अमरावतीचे चंदन नागवणी, प्रकाश रावलानी या दोघांचा समावेश असून मध्यप्रदेशातील रतलामचे गोलू मुंडे, संजय मालवीय, उज्जैन जिल्ह्यातील नागदाचे आकाश सिंदल, सुनील चव्हाण, ताल गावातील नरेंद्र चव्हाण, रतलामचा प्रकाश मालवीय आणि शकिर खा शकुर खा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments