Home ताज्या घडामोडी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची बुलडाणा येथील बालगृहाला भेट

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची बुलडाणा येथील बालगृहाला भेट

बुलडाणा

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट दिली. यावेळ त्यांनी इमारतीमधील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच बालगृहातील सध्या प्रवेशित मुलांशी चर्चा केली. बालगृहात मागे झालेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी प्रवेशित असलेल्या मुलांकडून महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सत्कार स्वीकारला.
यावेळी त्यांच्यासमावेत जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, माजी आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प सदस्य जयश्रीताई शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. रामरामे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सोनुने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी श्री. मराठे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments