Home ताज्या घडामोडी पाकिस्तानकडून शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्याचा प्रयत्न !

पाकिस्तानकडून शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्याचा प्रयत्न !

नवी दिल्ली
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी तसंच प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाकिस्तानमधील ३०० ट्विटर हॅण्डल्सची माहिती सापडली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. ट्रॅक्टर मोर्चाबद्दल माहिती देताना विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असं सांगितलं आहे.या मोर्चाच्या माध्यमातून पाकिस्तान घातपात करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

“लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल इतर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. मात्र तरीही प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत मोर्चा काढला जाईल,” अशी माहिती दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे.

“पाकिस्तानमधील दहशतवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करु शकतात असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत,” असं त्यांनी सांगितलं आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. यामध्ये खासकरुन पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत. कायदे रद्द केले जावे ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून यावर ते ठाम आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चा काढला जाऊ नये अशी विनंती केली असताना शेतकरी मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments