Home Uncategorized पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यंच्यासह चार पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार

पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यंच्यासह चार पोलिसांना राष्ट्रपती पुरस्कार

अमरावती

 प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्यासह राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि पुरुषोत्तरम बारड यांना धाडसी कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते चौघांनाही सन्मानित केले जाणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना डॉ. हरी बालाजी एन यांनी नक्षलवाद्यांविरोधात 60 पोलिसांची विशेष तुकडी गठीत केली होती. या तुकडीचा प्रमुख म्हणून त्यांनी 19 नोव्हेंबर 2018 रोजी कुख्यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या धाडसी कामासाठी डॉ. हरी बालाजी एन यांना राष्ट्रपती पुरस्कर प्राप्त झाला.

राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस आयुक्तालयातील रीडर शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि विशेष शाखेचे पुरुषोत्तम बारड यांना विशेष कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन, पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक मंगलेकर आणि पुरुषोत्तम बारड यांना जून महिन्यात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments