Home ताज्या घडामोडी दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान हिंसाचार; 83 पोलीस जखमी

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान हिंसाचार; 83 पोलीस जखमी

दिल्ली
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यानच्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यामध्ये ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आणखीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून या घटनेमुळे राजधानीत खळबळ उडाली.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आठ बस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान, हिंसाचार आणि आंदोलनाला लागलेल्या गालबोटानंतर प्रजासत्ताकदिनी दिल्लीत काढण्यात आलेली ट्रॅक्टर परेड मागे घेण्याचा निर्णय संयुक्त किमान मोर्चाने घेतला आहे. तसेच या परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या निश्चित आंदोलनस्थळी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments