Home ताज्या घडामोडी ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांसाठी ग्रामसडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : खासदार नवनीत...

ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांसाठी ग्रामसडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : खासदार नवनीत राणा

अमरावती

मेळघाटसह ग्रामीणभागाच्या विकासासाठी रस्त्यांचे मजबूत जाळे असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी आज येथे दिले.

            जिल्हा विकास व संनियंत्रण (दिशा) समितीची सभा यांच्या खासदार श्रीमती राणा अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व विविध शासकीय विभागाचे प्रमुख आदी बैठकीला उपस्थित होते.
            
खासदार श्रीमती राणा म्हणाल्या की, मेळघाटात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेळघाटातील रस्त्यांच्या कामांना वनविभागाचे नाहरकत परवानगी लागत असल्यामुळे तत्काळ पाठपुरावा करुन रस्ता बांधकामाची कामे पूर्ण करावी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निर्माण करण्यात येणारे रस्ता बांधकामे कायमस्वरुपी टिकणारी असावी. प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी व ग्रामीण भागातील प्रलंबित घरकुले तत्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने सुरळीत नियोजन करावे. वर्ष 2022 पर्यंत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी जबाबदारीपूर्वक कामे करावी. गावठाण व नझूलच्या जागेवर असलेले अतिक्रमण नियमानुकूलची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आदेश खासदार श्रीमती राणा यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले.
 
            खासदार श्रीमती राणा म्हणाल्या की, पायाभूत सुविधा, बांधकाम आदी कामे व इतर विकासकामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्डधारकांना नियमितपणे उपलब्ध करुन देण्यात यावी. या माध्यमातून ग्रामस्थांना स्थानिकरित्या रोजगार प्राप्त होईल व त्यांचे इतरत्र स्थलांतर रोखले जाईल. मेळघाटातून होणारे स्थलांतर लक्षात घेता तिथे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. गरजू व वंचितांना धान्य पुरवठा नियमित व्हावा. ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी अपूर्ण असलेल्या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

            सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, केंद्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बालविकास योजना, शालेय मध्यान्ह योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, डिजीटल इंडिया- पब्लिक इंटरनेट एक्सेस प्रोग्राम, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना आदी विविध योजना व उपक्रमांच्या कामांचा आढावा यावेळी खासदार महोदयांनी घेतला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments