Home ताज्या घडामोडी एक फेब्रुवारीचा शेतकरी मोर्चा रद्द

एक फेब्रुवारीचा शेतकरी मोर्चा रद्द

दिल्ली
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सीमेवर काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता बजेटच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

भारतीय किसान युनियनचे बलबिरसिंग राजेवाल म्हणाले, “प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर आता १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आंदोलनांतर्गत शहीद दिनी आम्ही देशभरात मोर्चे काढणार आहोत. आम्ही एक दिवसाचा उपवासही करणार आहोत असे बलबिरसिंग राजेवाल यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या कट कारस्थानामुळे ट्रॅक्टर परेड फेल गेली. यामध्ये अडथळे आणण्याचे सरकारने प्रयत्न केले. यामध्ये ९९.९० टक्के लोक हे शांततेत आंदोलन करत होते. मात्र, काही चुकीच्या घटना घडल्या. सरकारने आमच्यासमोर अनेक अडथळे निर्माण केले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असेही राजेवाल यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments