Home ताज्या घडामोडी अपघातात दुचाकी पेटल्याने दोघांचा होरपळून मृत्यू

अपघातात दुचाकी पेटल्याने दोघांचा होरपळून मृत्यू

परतवाडा मार्गावरील टाकरखेडा पुर्णा नजिकची घटना

अमरावती,

बोलेरो पिकअप व दुचाकीच्या भिक्षण अपघात दूचाकीने पेट घेवुन यामध्ये १२ व १७ वर्षीय मुलांचा होरपळुन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी परतवाडा-अमरावती मार्गावरील टाकरखेडा पुर्णा येथे घडली.निवृत्त दिपक सोलव वय १२, सार्थक अनंत वैद्य वय १७ असे अपघातात मृतक झालेल्या मुलांची नावे आहेत.

अचलपूर तालुक्यातील तळणीपुर्णा येथील निवासी निवृत्ती व सार्थक हे दोन मुले एमएच २७ सिके ७२७६ क्रमाकाच्या दुचाकीने आसेगांवकडे जात असतांना विरुध्द दिशेने येणाऱ्या बोलेरो पिकअप एमएच २७ बिएक्स ३८१२ ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दुचाकीने अचानक पेट घेतली. यामध्ये दोन्ही मुले आगीत भाजल्या गेले.

घटनेनंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेवुन आगीवर नियंत्रण मिळविले. या अपघात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने दोघेही या आगीत चांगलेच होरपळले.निवृत्तीचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर सार्थकला तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याल मृत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
आसेगाव पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होवुनपंचनामा केला. अपघातामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments