Home Uncategorized डिसीपीएस धारकांचा कार्य गौरव पुरस्कार,स्नेहमीलन सोहळा

डिसीपीएस धारकांचा कार्य गौरव पुरस्कार,स्नेहमीलन सोहळा

अमरावती
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा अमरावती तर्फे आयोजित डिसीपीएस/एनपीएस धारक उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार वितरण ,महिला मेळावा व स्नेहमीलन सोहळा मनोरंजन सभागृह उर्ध्व वर्धा वसाहत पंचवटी चौक अमरावती येथे आज (31जानेवारी) आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुलभाताई खोडके ,कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव मेटांगे राज्य उपाध्यक्ष जुनी पेंशन हक्क संघटन, रश्मी ठाकरे अधीक्षक अभियंता ,सुरेखा वाडेकर ,उपकार्यकरी अभियंता,प्रांजली बारस्कार स.आयुक्त,माया वानखडे उच्च श्रेणी खंड विकास अधिकारी ,प्रिया देशमुख उपशिक्षणाधिकारी ,नरेंद्र वानखडे महिला बालकल्याण अधिकारी,पंकज गुल्हाने राज्य उपाध्यक्ष लिपिक कर्मचारी संघटना ,अतुल कडू ,मिलिंद सोळंके , संचिता गोगटे , कासीम जमादार,नदीम पटेल जुन्या पेंशन हक्क संघटनेचे राज्य, विभाग पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री गौरव काळे यांनी संघटनेची मागणी 1982/84 ची जुनी पेंशन योजना शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावी ,फॅमिली पेंशन आणि ग्रॅज्युटी केंद्र सरकार प्रमाणे द्यावी ,तसेच अनुकम्पा तत्वात थोडा बदल करून डिसीपीएस धारक मयत कर्मचारी यांच्या वारसांना न्याय तात्काळ विना अट दयावा ,तसेच जो पर्यंत अनुकम्पा पद भरती करत नाही तो पर्यंत मानधन तत्वावर महाराष्ट्र मधील सर्व कार्यलयात डिसीपीएस मयत कर्मचारी यांच्या वारसांना न्याय दयावा .तसेच महानगरपालिका अमरावती मधील जुन्या पेंशन चा विषय तात्काळ निकाली काढावा तसेच नगर परिषद नगर पालिका मधील कर्मचारी अधिकारी यांच्या बद्दल ठोस निर्णय घ्यावा .महाराष्ट्र मधील सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना डिसीपीएस,एनपीएस चा सर्व हिशोब आर 3 स्लिप द्वारा तात्काळ द्यावी ,मिसिंग क्रेडीट ,तसेच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांना तात्काळ द्यावी ।।अश्या मागण्या यावेळी व्यक्त केल्या.

आमदार सुलभाताई खोडके यांनी आश्वस्त केले की जुनी पेंशन मिळेपर्यंत मी तुमच्या संघटने सोबत राहील ,आणि तुमचे विषय विधानसभा मध्ये मांडेल, तसेच मुख्यमंत्री साहेब याच्याशी तुमच्या संघटनेची राज्य पातळीवर मीटिंग घेऊन काही विषय तात्काळ निकाली काढू .तसेच महानगरपालिका अमरावती येथील सर्व विषय लवकरच आयुक्त यांच्याशी चर्चा करून लवकरच निकाली काढू ,असे आश्वासन सुलभा खोडके यांनी दिले.

आजच्या कार्यक्रम मध्ये dcps/nps धारक उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार 55 कर्मचारी आणि अधिकारी यांना संघटनेद्वारा प्रदान करण्यात आला ।।

आजच्या कार्यक्रम ला अमरावती जिल्ह्यातील तमाम सर्व पेंशन फायटर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष महिला यांची उपस्थिती जास्त होती आणि संघटनेची जिल्हा महिला विंग ची घोषणा आज करण्यात आली ।

आजचा कार्यक्रम प्रास्ताविक भावना राऊत , संचालन प्राजक्ता राऊत ,आभार प्रदर्शन श्रीमती वाडेकर यांनी केले हा कार्यक्रम सफल करण्यामागे जिल्हा सचिव प्रज्वल घोम ,जिल्हा कार्यध्यक्ष रितेश जगताप ,जिल्हा कोषाध्यक्ष यश बहिरम ,जिल्हा उपाध्यक्ष योगेश पखाले ,संदीप गावंडे ,राजेश बगाडे ,प्रशांत दामेधर ,अक्षय साबळे तथा सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका अध्यक्ष तथा सर्व तालुका कार्यकारणी व समस्त पेंशन फायटर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा अमरावती यांनी परिश्रम घेतले ।।

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments