Home ताज्या घडामोडी अर्थसंकल्प 2021 : नागपूर , नाशिक मेट्रोसाठी कोट्यवधींची तरतूद

अर्थसंकल्प 2021 : नागपूर , नाशिक मेट्रोसाठी कोट्यवधींची तरतूद

नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी 2021 -22 चा देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच अजून दोन करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नसून टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर झाला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता. तसंच पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘मेक इन इंडिया’ टॅबचा वापर करण्यात आला. निर्मला सीतारामन यांचं भाषण १ तास ४९ मिनिटं चाललं
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता सुरु केलेलं अर्थसंकल्प वाचन १२ वाजून ५० मिनिटांनी थांबवलं. २०२० मध्ये त्यांनी दोन तास ४२ मिनिटं (१६२ मिनिटं) भाषण केलं होतं. दोन पानं शिल्लक असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपलं भाषण थांबवलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना, अनेकांचे लक्ष करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरकार किती रक्कमेची तरतूद करणार? याकडे लागले होते. सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. सध्या भारतात पहिल्या टप्प्याचे लसीकरण सुरु आहे.

पहिल्या फेजमध्ये सर्वात धोकादायक गटातील आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या लसीकरणाचा खर्च केंद्राने उचलला आहे. उर्वरित टप्प्यातही सर्व खर्च केंद्रच करणार ? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत.

कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अतिरिक्त मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. भारतात सध्या सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. पण करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढच्या काही दिवसात आणखी दोन करोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील, असे सीतारामन म्हणाल्या.

आर्मनिर्भर स्वस्थ भारत योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज
करोनामुळे सरकारसमोर मोठं आर्थिक आव्हान असून ८० हजार कोटींच्या निधीची गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 डिजिटल जणगणनेची घोषणा

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजिटल जणगणना करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे – निर्मला सीतारामन
दशात १०० नवे सैनिक स्कूल उभारणार
१०० नव्या सैनिक स्कूलची अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे.

शेतमालाला दीडपट हमीभाव

आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली.

महाराष्ट्रासाठी  मोठी घोषणा
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

१५ वर्ष जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’
निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.

तामिळनाडू, केरळ आणि आसाममधील रस्त्यांसाठी मोठी तरतूद
तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात येथे निवडणुका होणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

२०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यांसमोर असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments