Home ताज्या घडामोडी देशाचा नव्हे भाजपचा अर्थसंकल्प : खासदार संजय राऊत

देशाचा नव्हे भाजपचा अर्थसंकल्प : खासदार संजय राऊत

मुंबई

काही राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्या राज्यांना निधी देण्याचा निर्णय घेतला असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प आहे असं म्हणाव लागेल, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर खासदड संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काही राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निधी देण्यात आला आहे का यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे मत व्यक्त केलं आहे.

केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू या राज्यांमधील मूलभूत सुविधांसाठी भरपूर तरतूद करण्यात आली आहे. चारही राज्यांसाठी २.२७ लाख कोटींच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला. यावर उत्तर देताना राऊत यांनी, “असं असेल तर हा अर्थसंकल्प देशासाठी आहे, देशाचा आहे की एखाद्या राजकीय पक्षाचा आहे निधी वाटपाचा? निवडणुकीसाठी निधी वाटतात दिल्लीतून तसं सुरु आहे का? राष्ट्रीय कोषामधून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरु आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो,” असं मत व्यक्त केलं. तसेच “अशाप्रकारे निवडणुकासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला असेल तर त्याला राष्ट्रीय अर्थसंकल्प न म्हणता एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावं,” असा टोलाही राऊत यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना लगावला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments