Home Uncategorized प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ; कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी गरजूंना प्राधान्य...

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ; कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी गरजूंना प्राधान्य जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

अकोला

कोणत्याही व्यवसाय, रोजगारासाठी त्या त्या क्षेत्राचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असते. आपल्या क्षमता आणि कौशल्य ओळखुन त्याद्वारे आपण योग्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊन कौशल्याचा विकास केल्यास आपण आपले, आपले कुटुंब आणि पर्यायाने आपला समाज आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करतो. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील गरजू दिव्‍यांग, अनाथ, आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतकरी कुटुंबातील पाल्‍यांना तसेच विधवा , परितक्‍त्‍या स्त्रियांना आवर्जून प्राधान्‍य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी येथे दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज जिल्ह्यात प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना ३.० विकास योजनेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र शासन पुरस्‍कृत असलेल्‍या या योजनेची अंमलबजावणी आता राज्‍य सरकारव्‍दारे जिल्‍हास्‍तरावरुन होणार आहे. या कार्यक्रमास कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्‍कर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी.एन जयस्वाल, कौशल्‍य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुधाकर झळके हे उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, पंतप्रधान कौशल्‍य विकास योजना ३.० या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २३२ उमेदवारांना विविध कोर्सेसमध्‍ये प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. सद्यास्थितीत हेल्‍थ केअर सेक्‍टर मधील जनरल डयूटी असिस्‍टंट , अपेरल सेक्‍टर मधील स्युईंग मशीन ऑपरेटर या कोर्सचे प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. त्यासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, हे प्रशिक्षण विनामुल्‍य असून याचा लाभ प्रशिक्षणार्थांनी घ्‍यावा. प्रशिक्षणांतून युवकांना कौशल्‍य प्राप्‍त होऊन व आपल्‍या मध्‍ये कौशल्‍य निर्माण करुन रोजगार/स्‍वंयरोजगार उपलब्‍ध करुन घ्‍यावा. प्रशिक्षणातून उमेदवारांना कौशल्‍य प्राप्‍त होऊन त्‍यांच्यातील आत्मविश्वास वाढून रोजगार व स्‍वंयरोजगार प्राप्‍त झाला तर ते मुख्‍य प्रवाहात येतील. जिल्ह्यातील गरजू व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्‍तीत जास्‍त लाभ घ्‍यावा, असे आवाहन ही त्यांनी केले. कार्यक्रमाचे वेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करुन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक प्रांजली बारस्‍कर यांनी केले. त्यात त्यांनी या योजने बाबत अधिक माहिती साठी जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसर, प्रशासकीय इमारत २ रा माळा अकोला या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले . आभार सुधाकर झळके यांनी मानले. यावेळी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे व्यवस्थापक फारुख गयान, केंद्र प्रमुख निलेश पळसपगार, किशोर देशमुख व इतर कर्मचारी उपस्थिती होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments