Home विदर्भ दहिगाव रेचा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

दहिगाव रेचा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावती
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्व सुर्जी तालुक्यात येणाऱ्या दहिगाव रेचा येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विनोद रेचे (45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकार्याचे नाव आहे.

अंजनगाव तालुक्यातील दहीगाव रेचा येथील शेतकरी विनोद रेचे हे गुरुवारी रात्री दहिगाव शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये शेतातील पिकाला पाणी देण्याकरिता रात्री गेले होते. दरम्यान विनोद रेचे यांनी स्वतःच्या शेतमधील विहिरीत आत्महत्या केल्याचे घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सततची नापिकी व खाजगी कर्जाचा डोंगर, मुला मुलीचे शिक्षण,मुलींचे लग्नकार्य या विवंचेनेमुळे विनोद रेचे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. त्यांच्या पच्यात पत्नी सुवर्णा विनोद रेचे वय 38 , मुलगी वेदिका वय 18 तर मुलगा स्वानंद वय16 असा परिवार आहे.

दहिगाव रेचा येथील पोलीस पाटील रवींद्र रेचे यांनी आज सकाळी माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती दिली, पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश राठोड, उप निरीक्षक विशाल पोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. किशोर घुगे पो.कॉ.विनोद मोरे करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments