Home ताज्या घडामोडी क्षेत्र सोडून बोलताना काळजी घ्यावी ; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरांना सल्ला

क्षेत्र सोडून बोलताना काळजी घ्यावी ; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरांना सल्ला


पुणे

भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर यांनी सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतली. त्या विषयावर, आज पुण्यात कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवारांनी आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा सल्ला सचिन तेंडुलकरला दिला.
“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.” असे शरद पवार म्हणाले.

“इतके दिवस शेतकरी रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत” असे शरद पवार म्हणाले.
“शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही” असे शरद पवारांनी सांगितले. “सर्वोच्च स्तरावर जर प्रयत्न केला, तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो. तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे” असे शरद पवार म्हणाले.
काय

सचिन तेंडुलकरने केले ट्विट

“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments