Home Uncategorized गाडगे महाराज वृध्दाश्रमात सुरू असलेल्या कार्याचे मिशनच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक

गाडगे महाराज वृध्दाश्रमात सुरू असलेल्या कार्याचे मिशनच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक

अमरावती |

संत गाडगे महाराज मिशन अंतर्गत वलगांव या ठीकाणी १९६३ पासून वृध्दाश्रम चालविले जात आहे, या ठीकाणी आज ३० वृध्द वास्तव्यास आहेत आणि वृध्दाश्रमाचे संचालक डॉ कैलास बोरसे हे सहपरीवार गेल्या २५ वर्षांपासून येथील वृध्दांची अविरत सेवा करीता आहेत. तसेच गाडगे बाबांच्या विचारांना उजाळा देण्याकरीता या ठीकाणी वेळोवेळी नाविण्यपुर्ण उपक्रम तसेच कार्यक्रम राबविले जातात.

२० डीसेंबर रोजी गाडगे महाराजांची पुण्यतिथी असते, यावेळी गावकऱ्यांच्या जुन्या रितीरिवाजाप्रमाणे या वृध्दाश्रम परीसरात गाडगे महाराजांचे सात दिवसांचे तिर्थ स्थापन करून शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि महापंगत दिली जात असे, पण यावर्षी कैलास‌ बोरसे यांनी या‌ रितीरिवाजाला फाटा देऊन गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने या पुण्यतिथी महोत्सवात होणारा अवाढव्य खर्च कमी करीत शिराळा येथे फवारणी दरम्यान विषबाधा होऊन मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या परीवारास आर्थिक सहकार्य करीत गाडगे महाराजांच्या विचारांना पुढे नेण्याच काम केल अशा शब्दात गाडगे महाराज मिशनचे चेअरमन श्री मधुसूदन मोहीते पाटील यांनी येथे सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना काळात सुध्दा या वृध्दाश्रमामध्ये दाखल वृध्दांची विशेष काळजी घेऊन वृध्दांचा कोरोनापासुन बचाव करण्यात कैलास बोरसे यांनी महत्वाची भुमिका निभावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गाडगे महाराज निर्वाणभूमी स्थळाला पर्यटनक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा देऊन या ठीकाणी ४० कोटींची विकासकामे घडवुन आणण्यात पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी विशेष पुढाकार घेतला, त्यांच्या हातून गाडगे बाबांच कार्य अविरत पुढे सुरू रहाव याकरीता आज गाडगे महाराज मिशनच्या सभासद म्हणून ताईंचा गौरव करण्यात आला, ताईंच्या साथीने आणि मार्गदर्शनात गाडगे महाराजांनी स्थापन केलेल्या गाडगे महाराज मिशनचे कार्य वाढविण्याकरीता सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहीजेत असे यावेळी मिशनचे सचिव श्री सचिन राजारामबाप्पू घोंगटे यांनी सांगितले.

यावेळी श्री अशोकजी पाटील, अशोकराव घारड, पुर्ण बोरसे, मयूर सोळंके, चेतन बोबडे, अनिकेत दहातोंडे, मयूर बोबडे, मंथन साबळे, गोविंद व्यास, सर्वेश उंबरकर, योगेश तायडे, शुभम तसरे, सचिन दहीकर, अंकूश मौर्य, पवन ठाकूर, शाम लोणकर, पप्पू बोबडे, दादू वानखडे, सनि सुर्यवंशी आदी उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments