Home विदर्भ बिबट-मानव संघर्ष आणि वनवणवा जनजागृती कार्यशाळा

बिबट-मानव संघर्ष आणि वनवणवा जनजागृती कार्यशाळा

बुलडाणा

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील प्रादेशिक वनविभाग अंतर्गत जंगलातील एकूण १० गावांच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शेतकरी, वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

“गावकरी आणि वनपाल व वनरक्षक यांचा समन्वयातुन वनसंवर्धन” अशी या कार्यशाळेची मध्यवर्ती संकल्पना होती. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी ‘बिबट-मानव संघर्ष: आव्हान व संधी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बुलढाणा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये वन परीक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ व मानद वन्यजीव रक्षक मंजित सिंग यांच्या पुढाकाराणे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शेतकरी व गावकऱ्यांनी उत्तम संवाद साधला. तीन गावांच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जंगलातील विशिष्ट क्षेत्र राखीव ठेऊन त्यात चराई न करण्याचा आणि देशी वृक्ष लागवड करून ती जगविण्याचा संकल्प देखील केला. बिबट व इतर वन्यप्राणी शेती शिवारात व गावपरिसरात आल्यास कार्यशाळेत सुचविल्याप्रमाणे आम्ही वन विभागाला सहकार्य करू अशी ग्वाही देखील यावेळी गावकऱ्यांनी दिली. ‘जंगल व वन्यप्राणी संवर्धन व संरक्षण’ करण्याची जबाबदारी केवळ वन विभागाची नसून ती आपली सर्वांची आहे या विचाराचे बीजारोपण या कार्यशाळेत करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी व्हावी यासाठी वन परीक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व त्यांची चमू, मानद वन्यजीव रक्षक, तरुणाई फाउंडेशन व गावकऱ्यांनी सहकार्य केले. तरटे पाटील यांनी आपल्या खुमासदार व वऱ्हाडी शैलीत गावकऱ्यांशी संवाद साधला. ‘वन्यप्राणी व स्थानिक गावकरी’ यांचे सहजीवन शक्य असून मी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो आहे, असेही ते म्हणाले. गावकऱ्यांच्या विनंतीवरून व स्थानिक वन प्रशासनाच्या सहकाऱ्याने पुढील कार्यशाळेचे नियोजन ठरविले आहे. येणाऱ्या काळात इतर वन परीक्षेत्र व अधिक लोकांपर्यंत जाण्याचा त्यांचा मानस असल्याचेही यावेळी तरटे पाटील म्हणाले. प्राणवायू, पाणी व अन्न देणाऱ्या वन व वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊन गावकऱ्यांनी वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments