Home ताज्या घडामोडी रिकी पोंटिंगची कार चोरट्यांनी पळविले

रिकी पोंटिंगची कार चोरट्यांनी पळविले

मेलबर्न

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक रिकी पाँटिंग याच्या घरी चोरट्यांनी हात साफ केले आहेत. ‘चॅनल 7’ या ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिनीनं याबाबतची बातमी दिली आहे. पाँटिंगच्या मेलबर्न येथील घरासमोर उभी असणारी कार चोरट्यांनी पळविली.

पाँटिंगच्या घरातील पार्किंगमध्ये उभी असलेली कार चोरल्याची बातमी ‘चॅनल 7’नं दिली आहे. घरात चोरी झाली तेव्हा पाँटिग आपल्या कुटुंबासोबत मेलबर्नच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला होता. पाँटिंगनं स्थानिक पोलिसांत याबाबतची तक्रार केली आहे. पाँटिंगनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य तात्काळ सुरु केलं.

यासाठी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि एअरविंग तैनात करण्यात आले होते. अखेर दुसऱ्या दिवशी शनिवारी पोलिसांना मेलबर्नच्या केम्बरवेल भागात गाडी सापडली. मात्र, गाडी चोरणारे अद्याप पसार असून पोलिस शोध घेत आहेत.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments