Home ताज्या घडामोडी प्रेमप्रकरणातून व्हॅलेंटाईन डे ला दुहेरी हत्याकांड;अमरावती जिल्ह्यात खळबळ

प्रेमप्रकरणातून व्हॅलेंटाईन डे ला दुहेरी हत्याकांड;अमरावती जिल्ह्यात खळबळ

अमरावती

तारूण्यात येताच दोघांचे प्रेम जुळले. प्रेमाला घरच्यांचा विरोध परंतू विरोधाला न जुमानता दोघेही, विवाह न करताच लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मध्ये पती- पत्नी प्रमाणे राहायला लागले. हे युवतीच्या कडील मंडळींना आवडले नाही. यातून झालेल्या वादात कथित जावायाने व्हॅलेंटाईन डे ला,सासऱ्याची व साळ्याची धारदार शस्त्राने हत्या केली.यात कथित जावायाचा आजे सासरा ही गंभीर जखमी झाला. ही घटना चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथे, रविवार १४ फेब्रुवारीला सायंकाळी साडे सात वाजता घडली.प्रकरणातील आरोपी रवी सुरेश पर्वतकर,वय २३ वर्षे,राहणार महाविर काॅलनी अमरावती.हा आपल्या लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मधिल पत्नीला घेऊन फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

नातेवाईकांच्या विरोधामुळे लग्नास अडथळा प्राप्त माहितीनुसार सदर प्रकरणातील आरोपी व त्याची कथित पत्नी,हे दोघेही अमरावती येथे राहत होते. तेथे राहत असतांनाच दोघांचेही प्रेम जुळले.लग्नाच्या आणा-भाका झाल्या.परंतू दोघांचा समाज वेगळा-वेगळा असल्याने, युवतीच्या घरच्यांन कडून लग्नाला विरोध झाला.लग्नाला विरोध झाल्या मुळे दोघांनीही,लग्न न करताच लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ते राहायला लागले.दोघेही सज्ञान असल्यामुळे कायद्या नुसार,याला कोणालाही विरोध करता आला नाही.परंतू युवतीच्या घरच्यां कडून,या दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न होतच राहीला.काही दिवसांनंतर युवती कडील मंडळी,युवतीला आपल्या घरी कुरळ पूर्णा येथे घेऊन आले.

घटस्फोट स्टॅम्पवर जबरदस्ती सही करण्यावरून झाला वाद त्यानंतर सदर युवतीला तिच्या घरच्यांनी परत आरोपी कडे जाऊ दिले नाही.तसेच लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मध्ये राहणार्थऱ्या पती-पत्नी ची सोडचिठ्ठी घेण्याची तयारी युवती कडील म़डळींनी केली.याच दरम्यान व्हॅलेंटाईन डे ला प्रकरणातील आरोपी,आपल्या कथित पत्नीला घ्यायला कुरळ पूर्णा येथे आला.यावेळी युवती कडील मंडळींनी आरोपीला, आधीच लिहून ठेवलेल्या घटोस्फोटाच्या स्टॅम्प पेपर वर सही करण्यासाठी दबाव आणला.परंतू त्यांच्या या दबाला बळी न पडता,आरोपी आपल्या लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मधील पत्नीस बळजबरीने घेऊन जाण्यास निघाला. आरोपी युवतीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतांना, आरोपी व युवतीकडील मंडळीत जोरदार वाद झाला.

आरोपी दुचाकीवरून फरार
या वादानंतर ही आरोपी दुचाकीवरून सदर युवतीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतांना,युवतीचे आजोबा, वडील व भाऊ हे तिघे मोटर सायकलला थांबवायला आडवे आले.या दरम्यान आरोपी व युवती कडील तिघांमध्ये चांगलेच भांडण जुंपले.युवती कडील तिघेही आरोपीस, युवतीला घेवून जाण्यास वारंवार मज्जाव करीत होते.यावरून आरोपीने आपल्या जवळील धारदार शस्त्राने (चाकूने),तिघांवरही जोरदार हल्ला केला.
आरोपीच्या या हल्ल्यात,युवतीचे वडील बंडू साबळे,भाऊ धनंजय साबळे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.तर युवतीचे आजोबा विश्वनाथ साबळे हे गंभीर जखमी झाले.अशा परिस्थितीत संधीचा फायदा घेऊन घटनास्थळा वरून आरोपी,आपल्या लिव्ह अॅन्ड रिलेशनशिप मधील 22 वर्षीय पत्नीस घेऊन, दुचाकी क वरून फरार झाला आहे.


या प्रकरणी मयत बंडू साबळे यांची पत्नी मीरा साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,पोलीसांनी आरोपी विरूद्ध अपराध क्रमांक ६५/२०२१ कलम ३०२, ३०७, ३६४ भा.द.वी.नुसार चांदूरबाजार पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपी अढळून आल्यास, चांदूरबाजार बाजार पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान स्थानिक पोलिसां कडून नागरिकांना करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments