Home विदर्भ पळसोणा येथील घटनापत्नीकडून पतीची हत्या;

पळसोणा येथील घटनापत्नीकडून पतीची हत्या;

अमरावती
जिल्ह्यातील वरुड तालुक्यात येणाऱ्या बेनोडा शहिद नजीकच्या पळसोणा गावात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना दि.१७ फेब्रुवारीच्या सकाळी उजेडात आली.दसरी साहेबराव उईके वय ४३रा. पळसोणा असे आरोपी पत्नीचे नाव असून तिने तिचा पती साहेबराव गोमाजी उईके वय ४८रा. पळसोणा याची हत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे.
पळसोणा येथील रहिवासी उभयतांना दारुचे व्यसन असून त्यातून नेहमीच त्यांच्यात खटके उडत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. तोघेही शेतात मजूरीचा व्यवसाय करत होते. कालही ते एकाच शेतात ओलीतासाठी गेले होते असल्याचे सांगितले आहे. यांचा विवाह१६ वर्षांपूर्वी झाला असून त्यांना १४ व १२ वर्षांच्या दोन मुली आहेत.दोघेही नेहमीच सोबत कामावर जायचे आणि सोबतच दारू ढोसायचे. त्यातून त्यांचे वाद व्हायचे.

दररोजच्या या पतीपत्नीच्या वादात कुणी हस्तक्षेप करत नव्हते.काल दि. १६ ला रात्री ८ वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे अशीच दारू पिल्यानंतर त्यांच्यात वादाची ठीणगी पडली.वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोघांनीही एकमेकांना मारहाण करताना पत्नी ने लाकडाच्या काठीने पती साहेबराववर दणके द्यायला सुरुवात केली.काही वेळाने वाद मिटला व दोघेही झोपी गेले. मात्र सकाळी साहेबराव काही उठत नव्हता. तेव्हा लक्षात आले की त्याचा म्रुत्यु झाला आहे. काठीचे घाव डोक्यावर लागल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पतीचा म्रुत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले

घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून म्रुतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीवरून म्रुताची पत्नी हीच्यावर भादंवी कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास एसडीपीओ कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मिलिंद सरकटे पोहेकाँ अनील भोसले, सुदाम साबळे,दिवाकर वाघमारे, गजानन कडु, सचिन भोसले, मंदा सावरकर, उत्तरा पांडे करीत आहे.

परिसरात हळहळ पतीकडून पत्नीच्या हत्येच्या घटना सर्वसामान्य वाटतात मात्र पत्नीकडून पतीची मारहाणीत झालेल्या हत्येची माहिती मिळताच परिसरात आश्चर्य आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments