Home विदर्भ शेतीच्या वादातून नातवाने केली आजीची हत्या

शेतीच्या वादातून नातवाने केली आजीची हत्या

अमरावती

मेळघाटात धारणी तालुक्यातील दुनी गावात वडील व मुलांमध्ये शेतीच्या वाटणी वरून वाद झाला तो वाद सोडविण्याकरिता आजी व आई वाद मधात गेली असता नातवाने आजीच्या डोक्यावर लाकडी दांडा मारून आजीची हत्या केली तर त्याच्या आईला सुद्धा मारहाण करून जखमी केले .

प्राप्त माहिती नुसार धारणी तालुक्यातील दुनी गावातील रहिवासी असलेले हरीचंद्र सज्जू जांभेकर वय 50 वर्ष त्यांचा मुलगा रामेश्वर हरीचंद्र जांभेकर वय 30 वर्ष आजी गँगू सज्जू जांभेकर वय 70 वर्ष व हरीचंद्र यांची पत्नी हे चौघे त्यांच्या दुनी शेतशिवारात असलेल्या शेत सर्वे न 72 मध्ये गहू चना पेरणी केलेल्या पिकाची रखवाली करण्याकरिता शेतातच राहत होते. हरीचन्द्र यांचा मुलगा रामेश्वर काही काम न करता रोज दारू पिऊन मला शेती माझ्या नावावर करून द्या या करणावरून वारंवार वडिलां सोबत वाद घालत होता तशाच वाद बुधवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान वडील व मुलात झाला तो वडीलाला मारण्याकरिता लाकडी दांडा घेऊन त्यांच्या अंगावर धावत होता त्या दरम्यान त्याची आई व आजी गँगु जांभेकर या दोघांतील वाद सोडायला गेल्या त्यात नातवाने आजीच्या डोक्यात तो लाकडाचा दांडा मारून आजीची हत्या केली तर त्याच्या आईला पण मारहाण करून जखमी केले व त्या मारहाणीत त्याच्या पण डोक्याला दुखापत झाली आहे .

घटनेची माहिती धारणी पोलिसाना मिळताच निरीक्षक विलास कुलकर्णी पीएस आय हर्षल चाफले पोलीस कर्मचारी अनुराग पाल,संजय खाडे, रवी पाखरे यांनी घटना स्थळ गाठून आरोपी रामेश्वर जामभेकर ला ताब्यात घेतले व तो जखमी असल्या मुळे त्याला व त्याच्या आईला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून आरोपी विरुद्ध वडिलांची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात ला सुरू असून पुढील तपास धारणी पोलीस करत आहे

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments